जंगल तोडीचे [वृक्षतोड] कारणे व परिणाम [संपूर्ण माहिती]

जर तुम्हाला तुमच्या शाळेच्या कामासाठी म्हणजे, तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये जेव्हा शाळेतील दुसऱ्या एखाद्या उपक्रमासाठी जंगल तोडीचे [वृक्षतोड] कारणे व परिणाम काय आहेत हे जाणून घ्यायचे असेल तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.

आम्ही या पोस्टच्या सहाय्याने, तुम्हाला जंगल तोडीचे [वृक्ष तोडीचे] कारणे काय आहेत आणि त्याची पर्यावरणावर व मानवी जीवनावर काय परिणाम होतात हे सांगण्याचा प्रयत्न केला जाईल.

  1. जंगल तोड म्हणजे काय ?
  2. जंगल तोडीचे कारणे काय आहेत ?
  3. जंगल तोडीचे परिणाम काय आहेत ?
  4. निष्कर्ष

जंगल तोड/ वृक्षतोड म्हणजे काय ?


आजच्या दिवशी काही वर्षापुर्वीची आणि आज ची जर तुलना केल्यास तुमच्या लक्षात आली असेल, पूर्वी खूप जास्त प्रमाणामध्ये जंगलांची/ वृक्षांची संख्या होती. आणि आज आपण पाहतो तर जंगलांची संख्या कमी होत चालली आहे.

जेव्हा जंगल क्षेत्र तोडून त्या जमिनीचा कामासाठी वापर केला जातो त्याला जंगल तोड/ वृक्षतोड असे म्हणता येईल. लोक जंगल तोड करून त्या जमिनीचा किंवा जंगल तोडलेल्या जागाही वेगवेगळ्या कारणासाठी वापरली जाते.

एक वृक्षाचे रोप उंच/ मोठ्या झाडांमध्ये वाढ होण्यासाठीच बरीच वर्षे लागतात त्याच प्रमाणे एका जागेवर जंगल तयार होण्यासाठी खूप सारे वर्ष लागतात आणि मानव या जंगलाला फक्त काही दिवसांमध्ये तोडून नष्ट करतात. आणि जंगलतोडीमुळे पर्यावरण वेगवेगळे परिणाम होत असतात आणि पर्यावरणावर परिणाम झाला यावर त्याची मानवी जीवनावर सुद्धा परिणाम होतात.

जसं जसं लोकांमध्ये जंगल तोडी बद्दल जनजागृती वाढली, तसं त्याचा विरोध करण्यासाठी / जंगल तोड थांबवण्यासाठी लोक आंदोलन करू लागले.

असंच आंदोलनाचे उदाहरण म्हणजे “चिपको आंदोलन” आहे. या आंदोलन सुरुवात 1973 मध्ये उत्तराखंड मधून सुरू झाली होती. प्रामुख्याने या आंदोलनामध्ये महिलांचा समावेश होता आणि या आंदोलनाचा मुख्य उद्देश होता जंगलाची संवर्धन करणे / वनसंवर्धन करणे. या आंदोलनामध्ये, महिलांनी जंगलातील वृक्षाला चिटकून वृक्ष तोडण्यासाठी नकार दिला म्हणून या आंदोलना “चिपको आंदोलन” असे म्हटले जाते.

आणखी वाचा

जंगल तोडीचे कारणे काय आहेत ?


मानव जेव्हा जंगलाची तोड करतो, जंगल तोडी साठी काहीतरी कारण असेल मग कारण हे पर्यावरणाच्या फायद्याचं असो की नसो.

जंगल तोडीचे कारणे

1.औद्योगिकीकरण

औद्योगिकीकरण हे जगभरातील जंगलतोडी मागचे मुख्य कारणांमध्ये एक आहे. जेव्हा पासून मानवाचे पृथ्वीवर अस्तित्व निर्माण झाले आहे तेव्हापासून ते आजपर्यंत मानव आणि खूप मोठा विकास केला आहे कधी विकासासाठी जेव्हा जमिनीचे गरज पडते तेव्हा जंगलाचा भाग तोडून त्या जमिनीवर इमारती उभारणे/ घर बांधणे/ उद्योग उभा करणे अशा वेगवेगळ्या कारणासाठी वापर केला जातो.

2.इंधन

जेव्हा लोकांना जंगलाच्या या ठिकाणी इंधन असल्याचे समजते तेव्हा ते पूर्ण जंगलाला तोडून टाकून त्या ठिकाणी इंधन शोधतात. जेव्हा लोकांना लाकडांची गरज पडते त्यामध्ये स्वयंपाक करण्यासाठी तेव्हा ती जंगलाची तोड करतात.

3. मूल्यवान वस्तू शोधणे.

जेव्हा लोकांना समजते, जंगलाच्या ठिकाणी मूल्यवान वस्तू आहे उदाहरणार्थ हिरा तेव्हा जंगलाची तोड करून त्या ठिकाणी मूल्यवान वस्तू शोधल्या जातात. अशी घटना मध्यप्रदेश येथे झाली आहे.

जंगल तोडीचे परिणाम काय आहेत ?


मानव जंगलाची तोड करून, त्या जमिनीचा वापर वेगवेगळ्या कारणासाठी करतो जंगलातील लाकडाचा वापर इंधनासाठी करतो. पण दुसर्‍या बाजूला जंगल तोडीमुळे पर्यावरण परिणाम होतात.

जंगल तोडीचे परिणाम

1.पाऊस कमी पडणे.

मी अनेक वेळा अनुभवले असेल, या भागामध्ये सर्वात जास्त झाडांची/ वृक्षांची संख्या असते तेव्हा जंगल भाग सर्वात जास्त असतो त्या ठिकाणी भरपूर पाऊस पडतो. आणि ज्या ठिकाणी सर्वात कमी जंगलाचा भाग आहे त्या ठिकाणी कमी पाऊस पडतो. आणि म्हणून ज्या भागातील जंगल तोडले जात आहे या शेत्रात पाऊस कमी होण्याचा धोका आहे.

2. वन्यप्राण्यांची वस्ती नष्ट होणे.

जिथे जंगल आहे तिथे वन्यप्राणी त्यामध्ये पक्षी असो किंवा जमिनीवरील प्राणी वरील प्राणी, जमिनीच्या आत राहणारे प्राणी अशा वेगवेगळ्या वन्यप्राण्यांची वस्ती / वन्यप्राण्यांचा राहण्याचे ठिकाण जंगल तोडल्यामुळे नष्ट होऊन जाते.

निष्कर्ष


जंगल तोड करण्यामागे कारण आहे आणि त्याचे पर्यावरणावर होतच राहतात. म्हणून आपण जंगल तोड थांबवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याच बरोबर आपण वृक्षलागवड करून भविष्यात जंगलतोड कमी होण्यासाठी प्रयत्न करू शकतो.

आम्ही तुम्हाला या पोस्ट चा मदतीने जंगल तोड म्हणजे काय ? त्याचबरोबर जंगल तोड केली जाते म्हणजे त्याची कारणे काय आहेत हे सांगितले आहे. जंगलाची तोड केल्यामुळे त्याचे पर्यावरणावर काय परिणाम होत आहे हे सुद्धा सांगितले आहे.

Leave a Comment