Income Certificate Documents In Marathi | उत्पन्न दाखला

शैक्षणिक कामासाठी किंवा इतर ठिकाणी वेगवेगळे Documents/ Certificate नेहमीच लागत असतात. काही Certificate/ Documents आपल्याकडे पहिल्यापासून असतात पण बहुदा एक Certificate असल्यामुळे आपली शैक्षणिक किंवा इतर कामात अडथळा निर्माण होतो.

जर आपल्याला एखादं Certificate काढायला टाकायची असेल तर आपल्याला ते Certificate करण्यासाठी काय काय Documents लागतात हे लक्षात घेणे गरजेचे असते. नाहीतर जर आपण Documents काय लागतात हे लक्षात नाही घेतली आणी तसंच आपण Certificate काढण्यासाठी गेल्यानंतर पुन्हा Documents शोधण्यासाठी परत यावे लागते.

म्हणून जर तुम्हाला सुद्धा, Income Certificate [उत्पन्न दाखला] साठी कोण कोणते Documents लागतात हे जाणून जायचं असेल तर तुम्ही योग्य पोस्टवर आला आहात.

  1. Income Certificate/ उत्पन्न दाखला म्हणजे काय ?
  2. Income Certificate Documents In Marathi
  3. शेवटचे शब्द

Income Certificate [उत्पन्न दाखला] म्हणजे काय ?


Income Certificate म्हणजे उत्पन्नाचा दाखला, जास्त करून शैक्षणिक कामासाठी त्याची गरज लागत असते. या Certificate मध्ये अर्जदाराच्या घरचे किती वार्षिक उत्पन्न आहे हे दाखवले जाते आणि हे Certificate तुम्ही एक, दोन, तीन वर्षासाठी काढू शकता व Certificate कोणत्या वर्षापर्यंत वैध हे पण दिलेली असते.

त्याचबरोबर Income Certificate [उत्पन्नाचा दाखला] मध्ये तुम्हाला कोणत्या कामासाठी पाहिजे हे लिहिलेले असते आणी त्याच्यावर डिजिटल पद्धतीने स्वाक्षरी केली जाते. Income Certificate वर तुमच्या तालुक्याच्या नायब तहसीलदाराचे नाव असते.

आणखी वाचा

1. AFMC Information In Marathi | AFMC म्हणजे काय ?

2. How to Write 19 in Marathi In Words | 19 कसे लिहावे ?

3. जंगल तोडीचे [वृक्षतोड] कारणे व परिणाम [संपूर्ण माहिती]

Income Certificate Documents In Marathi [Maharashtra]


Income Certificate [उत्पन्नाचा दाखला] तयार करून घेण्यासाठी किंवा काढण्यासाठी प्रामुख्याने चार प्रकारचे Documents ची गरज लागते.

  • ओळखीचा पुरावा [Proof of Identity]
  • कोठे राहतात याचा पुरावा [ Proof of Address]
  • वयाचा पुरावा [Age Proof]
  • उत्पन्नाचा पुरावा [Proof of Income]
Income Certificate [उत्पन्नाचा दाखला]

ओळखीचा पुरावा:

ओळखीच्या पुराव्यांमध्ये जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तरी चालेल. जर आधार कार्ड नसेल तर पॅन कार्ड/ पासपोर्ट/ मतदार ओळखपत्र/ ड्रायव्हिंग लायसन्स/ MGNREGA जॉब कार्ड/ अर्जदाराचा फोटो सुद्धा वापरू शकता.

कोठे राहतात याचा पुरावा:

तुम्ही कुठे राहता याच्या पुराव्यासाठी तुम्ही वेगवेगळे प्रकारचे Documents चा वापर करू शकता. त्यामध्ये आधार कार्ड असेल तरी चालेल नसेल तर तुम्ही पॅन कार्ड/ पासपोर्ट/ मतदार ओळखपत्र/ ड्रायव्हिंग लायसन्स/ टेलिफोन बील/ राशन कार्ड/ लाईट बील/ पाणी चे बील यापैकी कोणतेही एक असेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता.

वयाचा पुरावा:

वयाचा पुरावा म्हणजे तुम्ही किती वर्षाच्या आहात. पण येते एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे जर तुमचे वय अठरा वर्षाच्या खाली असेल तरच तुम्हाला वयाच्या पुराव्याची गरज आहे. वयाच्या पुराव्यासाठी तुम्ही जन्माचा दाखला/ बोनाफाईड प्रमाणपत्र/ शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक वापरू शकता.

उत्पन्नाचा पुरावा:

उत्पन्नाचा पुरावा म्हणजे तुमच्या कुटुंबा मध्ये प्रतिवर्षी किती उत्पन्न होते याचा पुरावा. उत्पन्नाचा पुरावासाठी Income Tax Statement letter किंवा तलाठ्याने जारी केलेला उत्पन्नाचा दाखला तुम्ही वापरू शकता.

शेवटचे शब्द


आम्ही या पोस्टच्या सहाय्याने तुम्हाला Income Certificate [उत्पन्नाचा दाखला] म्हणजे काय हे सांगितले. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे Income Certificate Documents In Marathi म्हणजे उत्पन्नाचा दाखला साठी काय काय कागदपत्रे लागतात हे एका इन्फोग्राफिक च्या मदतीने सांगितले.

नोट: वरील सर्व डॉक्युमेंट्स आम्ही फक्त तुमच्या मदतीसाठी सांगितले आहेत.

Leave a Comment