Influencer Marketing Meaning in Marathi [पूर्ण माहिती]

जर तुम्ही ऑनलाइन जगात म्हणजे सोशल मीडियावर असाल तर तुम्ही Influencer Marketing हा जरा अवघड वाटणारा शब्द ऐकलाच असेल. आणि जर तुम्हाला पण Influencer Marketing म्हणजे काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात.

बऱ्याचदा आपल्याला एक सारखे वाटणाऱ्या शब्दांमध्ये फरक समजत नाही जसे की Digital Marketing आणि Influencer Marketing जर तुम्हाला पण अशा काही शंका असतील तरी या पोस्टमध्ये तुमच्या बऱ्याच शंका सोडल्या जातील.

▸ Influencer Marketing Meaning in Marathi

Influencer Marketing म्हणजे सोशल मीडियावरील प्रसिद्ध प्रभाव टाकणारे लोक त्यांच्याकडे एखाद्या प्रॉडक्ट ची Marketing करून घेणे. व्यापक दृष्टीकोनातून, सोशल मीडियावरील प्रसिद्ध लोक ज्यांच्याकडे लाखो-करोडो फॅन फॉलोविंग आहे त्यांना त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर [Instagram, Facebook, Twitter इत्यादी ] कंपन्यांच्या प्रॉडक्टची जाहिरात करायला लावतात.

Influencers त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटोच्या स्वरूपात किंवा व्हिडिओ च्या स्वरुपात कंपन्यांच्या प्रोडक्टची जाहिरात/ प्रमोट करत असतात आणि Influencers त्यासाठी कंपन्यांकडून शुल्क घेत असतात.

ज्या सोशल मीडिया स्टारची लोकांमध्ये जास्त प्रसिद्धी आहे किंवा जास्त लोक त्यांना मानतात ते Influencers कंपन्यांकडून जास्त शुल्क घेत असतात. उदाहरणार्थ जगातील एक सर्वोत्तम फुटबॉल खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डो 37 कोटी पेक्षा जास्त Instagram वर चाहते आहेत. भारतीय क्रिकेट खेळाडू विराट कोहली चे 17 कोटी पेक्षा जास्त Instagram वर चाहते आहेत. म्हणू

म्हणून क्रिस्टियानो रोनाल्डो, विराट कोहली सारखे Influencers कंपन्यांकडून बरीच शुल्क / रक्कम घेतात.

नोट: फक्त खेळाडू Influencers नाही तर वेगवेगळ्या श्रेणीतील Influencers लोकांना सुद्धा छोट्या-मोठ्या कंपन्या त्यांचे प्रॉडक्ट प्रमोट करण्यासाठी सांगतात उदाहरणार्थ बिजनेस इंस्टाग्राम पेजेस इत्यादी.

▸ Influencer Marketing Examples In Marathi

Influencer Marketing उदाहरण सांगायचे म्हणजे, तुम्ही प्रसिद्ध लोकांच्या सोशल मीडिया अकाउंटवर जाऊन पाहू शकता. कोणत्या प्रसिद्ध अकाउंट वरील Influencer Marketing चे उदाहरण पाहण्यासाठी एक युक्ती आहे ती म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीच्या Instagram पोस्टवरील लिहिलेले Paid “Partnership with कंपनीचे नाव”.

वरील फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता भारतीय क्रिकेटर विराट कोहली त्याच्या Instagram वर हिरो मोटर्स कंपनी बरोबर पार्टनरशिप केली आहे. हे Influencer Marketing चे उदाहरण आहे.

▸ Influencer Marketing आणि Digital marketing मधील फरक
Influencer Marketing ही Digital पद्धतीने होते त्यामुळे Influencer Marketing हा एक Digital Marketing मधील घटक आहे. डिजिटल मार्केटिंग मध्ये कंपन्या त्यांच्या सर्विस किंवा प्रॉडक्टची ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर जाहिरातीच्या मोहिमा [Campaign] चालवतात.
▸ Influencer Marketing बाजार भाव

फायनान्शिअल एक्सप्रेस नुसार भारतातील Influencer Marketing चा बाजार भाव 2021 चा शेवटी पर्यंत 900 करोड इतका होईल आणि बाजार भाव 2025 पर्यंत 25 टक्क्यांनी वाढेल [चक्रवाढ वार्षिक वाढीचा दर] आणि बाजार भाव ची किंमत 2200 करोड पर्यंत वाढेल.

▸ शेवटचे शब्द

तुम्ही या पोस्ट मधून शिकलात Influencer Marketing Meaning in Marathi, त्याचबरोबर तुम्हाला Influencer Marketing चे उदाहरण काय आहे हे सांगितले.

त्यानंतर Digital Marketing आणि Influencer Marketing मधील फरक काय आहे हे सांगितले व Influencer Marketing बाजार भाव किती आहे सांगितले व त्याची वाढ.

Leave a Comment