MTM Meaning in Marathi | MTM म्हणजे काय ?

बहुतेक करून MTM हे इंग्लिश शॉर्ट फॉर्म तुम्ही तुमच्या स्टॉक ब्रोकर च्या अकाउंट मध्ये किंवा ऑनलाईन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोणाच्या तरी स्क्रीनशॉट/ फोटो मध्ये पाहिला असेल. अनेक क्षेत्राप्रमाणे Stock Market मध्ये सुद्धा असे अनेक इंग्लिश शॉर्ट फॉर्म असतात तर तुम्ही काही शॉर्टफॉर्म बद्दल जाणून असाल तर काही बदल नाही.

जर तुम्हाला पण MTM Meaning / MTM म्हणजे काय हे समाजात अडचण आली असेल तर हि पोस्ट तुम्हाला मदत करू शकते आणि MTM बद्दल सर्व महत्वाचे मुद्दे तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करू.

► MTM Meaning in Marathi [Share Market]

बहुधा तुम्ही Stock Market/ Share Market या क्षेत्रांमध्ये नवीन आहात आणि तुम्ही Stock Market बद्दल जाणून घेतात आणि मार्केट समजण्यासाठी तुम्हाला MTM म्हणजे काय आहे ? हे जाणून घ्यायचे आहे. आणि तुम्ही स्टॉक मार्केट समजण्याच्या बरोबर मार्गावर आहात.

MTM म्हणजे तुम्ही Instruments खरेदी केलेल्या गुंतवणुकीमध्ये किती वाढ होते किंवा घट होते [चालू शेअर बाजारांमध्ये] हे अचूक पद्धतीने दाखवले जाते. जर तुमच्या गुंतवणुकीमध्ये वाढ होते तेव्हा MTM [+] मध्ये असते आणि जेव्हा तुमच्या गुंतवणुकीमध्ये घट होते तेव्हा MTM [-] मध्ये असते.

त्याचप्रमाणे काही ब्रोकर्स MTM मधील वाढ हिरव्या रंगामध्ये दाखवतात तर घट लाल रंगा मध्ये दाखवतात.

नोट: MTM मध्ये एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की जर तुमच्या ट्रेडिंग अकाउंट मध्ये Shares/ Derivatives खरेदी केली असतील,मार्केट संपल्यानंतर जर MTM पॉझिटिव्ह असेल तर ते अमाउंट तुमच्या अकाउंट मध्ये टाकले [नफा] जाईल आणि जर निगेटिव्ह असेल तर तुमच्या अकाउंट मधून तितके अमाउंट निघून [तोटा] जाईल.

► MTM Example In Marathi

MTM उदाहरण, समजा तुम्ही XYZ ltd कंपनीचे 10 Equity Shares 100 रुपये प्रति share खरेदी केले. आणि ज्या दिवशी तुम्ही shares खरेदी केले आणि त्याच दिवशी तुम्ही 102 रुपये प्रति share ते 10 XYZ ltd shares विकले.

म्हणजे तुम्ही 1000 रुपयांचे share खरेदी केले आणि ते विकले 1020 रुपयांना. आणि या एका व्यवहारांमध्ये तुम्हाला 20 रुपयाचा नफा झाला. येथे 20 रुपये एका व्यवहाराचे MTM आहे आणि मार्केट संपल्यानंतर सेटलमेंट च्या वेळी हे 20 रुपये तुमच्या ट्रेडिंग अकाउंट मध्ये टाकले जातात.

याच्याविरुद्ध जर तुम्ही XYZ ltd कंपनीचे share जर तुम्ही ज्या दिवशी खरेदी केले त्याच दिवशी विक्री केली नसती तर आता तुम्हाला या व्यवहारांमध्ये MTM दिसणार नाही. आता येते MTM चे काही काम नाही.

नोट: MTM मध्ये एका ट्रेडिंग सेशनमध्ये जितका व्यवहार झाला आहे त्याचं मार्केट संपल्यानंतर सेटलमेंट होते आणि तेच तुमच्या अकाउंट मध्ये दिसते.

• MTM Full Form in Marathi

MTM : मार्क टू मार्केट.

► P&L आणि MTM मधील फरक

P&L म्हणजे Profit and loss म्हणजे मराठीत [In marathi] नफा आणि तोटा. मुळात p&l मध्ये सर्व प्रकारच्या व्यवहारातील नफा आणि तोटा दाखवला जातो. जर सर्व व्यवहारांमध्ये गणना करून नफा असेल तर नफा दाखवा किंवा वा तोटा असेल तर तोटा [-] दाखवला जातो.

अगोदर सांगितल्याप्रमाणे काही स्टॉक ब्रोकर्स P&L दाखवण्यासाठी सुद्धा रंगाचा वापर करतात त्यामध्ये नफा झाला असेल तर हिरवा रंग आणि तोटा झाला असेल तर लाल रंग.

शेवटचे शब्द

आम्ही तुम्हाला या पोस्ट मधून MTM Meaning in Marathi काय आहे हे समजून सांगितले त्यानंतर MTM चांगलं समजण्यासाठी तुम्हाला या त्याचे उदाहरण दिले आणि त्याचा मराठीमध्ये फुल फॉर्म. आणि शेवटी P&L आणि MTM मध्ये फरक काय आहे हे सांगितले.

Leave a Comment