Unicorn Information In Marathi [Startup] | Unicorn म्हणजे काय ?

Startups मध्ये खूप काही असे नवीन नवीन शब्द [terms] आहेत आणी Unicorn हा एक त्यामधील शब्द आहे. जर तुम्हाला Unicorn बद्दल काही माहिती नसेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात.

जर तुम्हाला Unicorn बद्दल Information पाहिजे असेल, तर तुम्हाला हे मार्गदर्शक जरूर मदत करेल.

  1. Unicorn म्हणजे काय ?
  2. Unicorn ची उदाहरणे
  3. Decacorn म्हणजे काय ?
  4. Decacorn ची उदाहरणे
  5. शेवटचे शब्द

Unicorn म्हणजे काय ? [Information In Marathi]


तुम्हाला जर Startups मध्ये रुची असेल तर तुमच्या कानावर Unicorn हा शब्द बऱ्याच वेळी पडला असेल. आणि त्यामध्ये 2021 मध्ये तुम्ही ऑनलाईन बातम्या मध्ये तुम्ही एक तरी बातमी ऐकली असेल/ पाहिली असेल Unicorn बद्दल.

जेव्हा Startup चे संस्थापक [Founders] Startup ला एक Idea पासून एक मोठा उद्योग उभा करतात / किंवा वेगवेगळ्या भागांमध्ये मध्ये विस्तार करतात. जस Startup ची वाढ होत जाते, तेव्हा Startup ची Value वाढत जाते.

जेव्हा Startup ची Valuation 1 बिलियन [ अमेरिकन डॉलर] चा वर तेव्हा त्या Startup ला Unicorn असे म्हटले जाते. भारतीय रुपया मध्ये जर तुम्हाला Startup Valuation काढायची असेल तर तुम्हाला अमेरिकन डॉलर ला भारतीय भारतीय रुपया मध्ये बदलावे लागेल. जर एक अमेरिकन डॉलर बरोबर 75 भारतीय रुपये [1 USD = 75 RS] तर Startup ची Valuation 7500 करोड च्या वर आहे तर तो Startup Unicorn आहे.

अमेरिकन डॉलरची भारतीय रुपयांमध्ये किंमत कमी-जास्त होत राहते म्हणून तुम्हाला Startup Valuation काढताना तुम्हाला अमेरिकन डॉलर भारतीय रुपया मध्ये किंमत किती आहे हे माहीत असणे गरजेचे आहे.

नोट: भारतामध्ये फक्त 2021 मधेच 43 Unicorn Startup निर्माण झाले आहेत.

Unicorn ची उदाहरणे


1. Meesho [मिशो]

Meesho हा एक भारतीय Startup आहे आणि या Startup ची स्थापना 2015 मध्ये बेंगलोर येथे झाली. ही एक Social E- Commerce कंपनी आहे आणि या Startup ची Valuation 4.9 बिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. [ सप्टेंबर 2021] म्हणून Meesho एक Unicorn Startup आहे.

2. Groww [ग्रो]

Groww हा एक भारतीय Startup आहे आणि या Startup ची स्थापना 2016 मध्ये बेंगलोर येथे झाली. हा एक Fintech Startup असुन Startup ची Valuation 3 बिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. Groww Valuation 1 बिलियन अमेरिकन डॉलर चा वर असल्यामुळे हा एक Unicorn Startup आहे.

आणखी वाचा

1. TTYL Full Form in Marathi | TTYL म्हणजे काय ?

2. BTST Meaning In Marathi | BTST म्हणजे काय ?

3. NTG Full Form in Whatsapp in Marathi | NTG म्हणजे काय ?

Decacorn म्हणजे काय ?


जास्त करून तुम्ही Unicorn Startup हा शब्द बऱ्याच वेळा ऐकला असेल आणि Decacorn Startup हा शब्द कमी वेळा ऐकला असेल. कारण Unicorn Startup जास्त प्रमाणात आहेत Decacorn Startup ज्या तुलनेत.

ज्या Startup ची Valuation 10 बिलियन अमेरिकन डॉलर्स चा वर आहे त्या Startup ला Decacorn Startup असे म्हटले जाते. भारतीय रुपयांमध्ये ज्या Startup ची Valuation 75000 करोड चा वर आहे त्या Startup ला Decacorn Startup असे म्हटले जाते. [1USD= 75RS]

Decacorn ची उदाहरणे


1.Byju’s

Byju’s हा एक भारतीय Startup आहे आणि या Startup ची स्थापना 2011 मध्ये बेंगलोर येथे झाली. ही एक Edtech Startup असुन Startup ची Valuation 21 बिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. [डिसेंबर 2021] Byju’s ची Valuation 10 बिलियन अमेरिकन डॉलर्स वर असल्यामुळे Byju’s एक Decacorn Startup आहे.

2. Paytm

Paytm हा एक भारतीय Startup आहे आणि या Startup ची स्थापना 2010 मध्ये बेंगलोर येथे झाली.ही एक Fintech Startup असुन Startup ची Valuation 16 बिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. [नोव्हेंबर 2021] Paytm ची Valuation 10 बिलियन अमेरिकन डॉलर्स वर असल्यामुळे Paytm एक Decacorn Startup आहे.

शेवटचे शब्द


आम्ही तुम्हाला या पोस्ट मधून, Unicorn Information in Marathi/ Unicorn बद्दल माहिती दिली. त्याचबरोबर Unicorn Startup चे उदाहरणे सांगितले. आणि शेवटी Decacorn म्हणजे काय उदाहरणासह सांगितले.

Leave a Comment